कर्मयोगी महानाट्यात वारकरी वेषभूषेत आ.सतेज पाटील यांचा सहभाग

कर्मयोगी महानाट्यात वारकरी वेषभूषेत आ.सतेज पाटील यांचा सहभाग

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील पॅव्हेलियन मैदानावर शनिवारी रात्री झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील 'कर्मयोगी' या महानाट्यात आमदार सतेज पाटील यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभाग घेतला.

कसबा बावडा येथील भगवा चौकात उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या आनंदा प्रित्यर्थ कसबा पावडर लाईन बाजारमधील तब्बल 2001 कलाकारांनी एकत्र येत पॅव्हेलियन मैदान येथे 'कर्मयोगी' हे महानाट्य सादर केले.  यामध्ये तत्कालीन ग्रामीण जीवन, शेतकरी जीवन, महाराजांची न्यायव्यवस्था, वारकरी संप्रदाय आदी घटनांचे चित्रण करण्यात आले होते.

यावेळी धनगरी ढोल वाजवण्यात आले. यामध्ये आमदार सतीश पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी ढोल वाजवून आनंद साजरा केला. त्यानंतर या महानाट्यातील वारकरी दिंडीमध्ये आमदार सतेज पाटील हे स्वतः टाळ घेऊन सहभागी झाले. यावेळी तब्बल 1000 बालकलाकारांनी शिवाजीं महाराजांच्या वेशभूशेत सहभाग घेतला.

 या महानाट्यनंतर आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह 2001 कलाकार मिरवणुकीने भगवा चौकात दाखल झाले. यावेळी शिवराज जाधव यांनी गारद म्हटली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण सोहळ्याचा आनंद सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी आता फटाक्यांच्या आतषबाजीने कसबा बावडा , लाईन बाजार परिसर उजळून निघाला.