कोल्हापुरात केंद्रीय आरोग्य केंद्र सुरू करावे, खासदार धनंजय महाडिक यांची मागणी

कोल्हापुरात केंद्रीय आरोग्य  केंद्र सुरू करावे, खासदार धनंजय महाडिक यांची मागणी
कोल्हापुरात केंद्र सरकारचे आरोग्य केंद्र सुरू होणे आवश्यक

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी 

सध्या दिल्लीमध्ये संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात खासदार धनंजय महाडिक यांनी नागरिकांच्या आरोग्य विषयक योजनांबाबत महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला. 

सार्वजनिक आरोग्य रक्षणासाठी केंद्र सरकारकडून जाणीवपूर्वक पावले उचलली जात आहेत. कोरोना काळात केंद्र सरकारचे कर्मचारी तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना आरोग्य विषयक अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सध्या पुण्यामध्ये केंद्र सरकारचे आरोग्य केंद्र आहे. मात्र, कोल्हापुरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना, पुण्यात जाऊन सुविधा घेणे शक्य होत नाही. त्यामुळे कोल्हापुरात केंद्र सरकारचे आरोग्य केंद्र सुरू होणे आवश्यक असल्याचे ते महाडिक यांनी सांगितले. 

या केंद्राचा उपयोग कोल्हापूर शहर आणि 11 तालुक्यातील ग्रामीण भागातील सुमारे 1 लाखांहून अधिक कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी यांना होऊ शकेल. शिवाय भारतील सैन्यातील जवान, माजी सैनिक यांच्या आरोग्यासाठीही हे आरोग्य केंद्र महत्वाचे आहे. त्यामुळे कोल्हापुरात लवकरात लवकर केंद्रीय आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी मागणी खासदार महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना केली. त्यांच्या या मागणीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.