जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सुधाकर कांबळे

जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सुधाकर कांबळे

कोल्हापूर प्रतिनिधि : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सुधाकर कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यासी अधिकारी विजय येळवडे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. कांबळे यांचे नाव रणजित पाटील यांनी सुचविले. बाजीराव पाटील यांनी अनुमोदन दिले.संस्थेने चांगल्या प्रकारे आर्थिक प्रगती केली असून, संस्थेच्या सभासदांचे हिताचे काम करण्यास सर्व संचालक आणि सुकाणू समिती कटिबद्ध आहोत. भविष्यात संस्थेच्या नावलौकिकात वाढच होत जाईल, असे कांबळे यांनी सांगितले.

यावेळी उपाध्यक्ष सचिन गुरव, संचालक उत्तम वावरे, रणजित पाटील, मुजम्मिल नावळेकर, अमर पाटील, जितेंद्र वसगडेकर, राहुलराज शेळके, सुरेश सुतार, रवींद्र जरळी, अजय शिंदे, संजय शिंदे, श्रीकांत चव्हाण, सुनील पाटील, बाजीराव पाटील, सरदार दिंडे, नंदीप मोरे, साताप्पा मगदूम, जयकुमार रेळेकर, सरोजिनी कोरी, सोनाली गुरव, तज्ज्ञसंचालक बाबासो साळोखे, पांडुरंग इंगळे, एम. आर. पाटील, विश्वास साबळे, महावीर सोळांकुरे, राजीव परीट, राजाराम वरुटे, एम. एम. पाटील, के. आर. किरुळकर, मनोहर भाट, सात्ताप्पा मोहिते, अजित मगदूम, शांताराम माने, विजय टिपुगडे, रविकुमार पाटील, प्रतिभा शिर्के, एन. डी. पाटील, अनिल आवळे, किरण मगदूम, दगडू परीट उपस्थित होते.