डॉ. संजय रोडगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस ला रामराम भारतीय जनता पार्टी मध्ये दाखल

डॉ. संजय रोडगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस ला रामराम भारतीय जनता पार्टी मध्ये  दाखल

सेलू प्रतिनिधी(गणेश साडेगावकर)

पक्षांतर्गत विरोधाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सरचिटणीस तथा वाशीम जिल्हा निरीक्षक डॉ संजय रोडगे यांनी अखेर भाजपची वाट धरली असल्याची चर्चा सध्या मतदार संघात होत आहे 

गेल्या 15 वर्षांपासून पक्षात कुठल्याही प्रकारे पदाची अपेक्षा न ठेवता पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी साभाळून पक्ष वाढीसाठी दिवस रात्र काम केले.रवळगाव ग्राम पचायत एक हाती सत्ता ,डॉ संजय दादा रोडगे मित्र मंडळाच्या माध्यमातून खेडोपाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवला. अनेक खेड्यात स्वखर्चाने विकास कामे केली. राजकारण,समाजकारण आणि श्रीराम प्रतिष्ठान च्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी यामुळे डॉ संजय रोडगे यांचे मतदार संघात एक वेगळीच ओळख निर्माण झाली .यातच त्यांनी ज़िल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी वरिष्ठाकडे इच्छा व्यक्त केली आणि पक्षातीलच अनेक नेत्यांच्या पाया खालची वाळू सरकली.डॉ संजय रोडगे आपल्याला भविष्यात वरचढ ठरणार असल्याचे समजताच त्यांना पक्षातर्गत विरोध करण्यास सुरुवात झाली.याची प्रचिती त्यांच्या स्वतःच्या कित्येक दिवसापाऊन ताब्यात असलेल्या रवळगाव ग्राम पंचायत मध्ये आली.माजी आमदार विजय भाबळे यांनी रवळगाव ग्राम पंचायत मिवडणुकीत हस्तक्षेप केल्यामुळे वादाची ठिणगी पडली. परंतु डॉ संजय रोडगे यांनी स्वतःचा पॅनल उभा करून सर्व जागा निवडून आणल्या. 

पक्षातर्गत विरोध,पक्षाच्या कार्यक्रमाला डावलणे अशा प्रकारे गटा तटाचे राज कारण त्यांना चागलेच जिव्हारी लागल्यामुळे अखेर त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि भाजपची वाट धरली असल्याचे समजते. 

यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या नगर पालिका,जिल्हा परिषद,पंचायत समिती,कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला याची चागलीच किंमत मोजावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब ....

एकीकडे नाराजी नाट्य चालू असताना दुसरीकडे डॉ. संजय रोडगे यांनी आमदार मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांची भेट घेतली यामुळे त्यांच्या भाजपा पक्षप्रवेशावर शिक्का मोर्तब झाले आहे. 31 मार्च रोजी डॉ. संजय रोडगे आपल्या काही समर्थकासोबत मुंबईला मा. ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाची भेट घेतली. आणि त्यांच्या जाहीर पक्ष प्रवेश लवकरच मोठ्या थाटामाटात सेलू येथे होणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले आहे