पाकिस्तान घाबरले ! सैनिकांबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय

पाकिस्तान घाबरले ! सैनिकांबाबत घेतला 'हा' मोठा  निर्णय

दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने कडक पावले उचलली असून, पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या हल्ल्यात पुण्यातील उद्योजक कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

या हल्ल्यामागे पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळे भारताकडून पुन्हा एकदा एअर स्ट्राइक होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे. पाकिस्ताननेही तातडीने एक बैठक बोलावली असून, भारताच्या कारवाईला प्रत्युत्तर देण्याची भाषा केली आहे. मात्र प्रत्यक्षात पाकिस्तानमध्ये गंभीर घबराट निर्माण झाली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानने आपल्या सैनिकांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत.

भारत सरकारने या हल्ल्यानंतर तातडीने पावले उचलत पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घेतले आहेत. सिंधू पाणी करार थांबवण्यासह अटारी बॉर्डर बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. देशभरात संतापाची लाट उसळली असून, दहशतवाद्यांवर कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. पाकिस्तानकडून येणाऱ्या कोणत्याही संभाव्य हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे, असे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही पाकिस्तानात जाहीर केले आहे.

केंद्र सरकारकडून स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत की, यावेळी कारवाई केवळ सूडापुरती न राहता दहशतवादाच्या मुळावर घाव घालणारी असेल. काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन्स सुरू असून, भारताच्या आगामी कृतीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.