पोटच्या पोराच्या लग्नाची तयारी सुरू अन् आई-वडिलांनी आयुष्य संपवले

पोटच्या पोराच्या लग्नाची तयारी सुरू अन् आई-वडिलांनी आयुष्य संपवले

नाशिक : पोटच्या पोराच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच आई-वडिलांनी विष घेऊन आयुष्य संपवल्याची खळबऴजनक घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकमधील टिळकवाडी भागात ही ह्रदयद्रावक घटना घडली आहे. दाम्पत्यांनी टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत अद्याप कोणताही माहिती मिळालेली नाही. पोलिसांकडून तपास सुरू आहे. पण लग्नाची तयारी सुरू होत असतानाच आई-वडिलांनी टोकाचे पाऊल उचलल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

घरात मुलाच्या विवाहाची तयारी सुरू असताना आई-वडिलांनी जीवन संपवले. टिळकवाडी भागात शहा दाम्पत्याने विष सेवन करून आत्महत्या केली. त्यामुळे नाशकात खळबळ उडाली. मुलासोबत भोजनानंतर व्यावसायिकाने पत्नीसह आत्महत्या केली. मुलाच्या लग्नाची तयारी घरात सुरू असताना आई-वडिलांच्या आत्महत्येने शहा कुटुंबास धक्का बसलाय. आत्महत्येचे कारण अस्पष्ट, शहा दाम्पत्याचा व्हीसेरा राखून ठेवला. वीस दिवसांवर धाकट्या मुलाचा लग्न सोहळा असताना आई-वडिलांनी आत्महत्येने केलेल्या खळबळ उडाली आहे.

उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू 

जयेश शहा आणि रक्षा शहा यांनी रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर झोपण्याआधी विष घेतले. त्यामुळे त्यांना रात्री ११ च्या सुमारास गंभीर अवस्थेत सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण त्यांनी प्राण सोडले. शाह यांचा मोठा मुलगा बांधकाम व्यवसायिक आहे, त्यानं रविवारी रात्री आईला फोन केला, पण बोलताना अडथळल्या. त्यामुळे त्याने घरी जाऊन पाहणी केली, ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर रुग्णालयात दाखल केला. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.