शेतकरी संघ निवडणूक उमेदवार सुभाष जामदार यांच्या प्रचाराचा नेर्ले येथे शुभारंभ

शेतकरी संघ निवडणूक उमेदवार सुभाष जामदार यांच्या प्रचाराचा नेर्ले येथे शुभारंभ

पत्रकार -नारायण लोहार

करवीर -आज कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघाच्या निवडणुकीतील उमेदवार सुभाष जामदार यांच्या प्रचाराचा शुभारंभ नेर्ले गावात झाला.प्रचाराचे उद्घाटन गोकुळ दुध संघाचे माजी संचालक कै.आनंदराव पाटील भेडसगावकर यांचे चिरंजीव विजय उर्फ दादा पाटील यांच्या हस्ते झाले.उमेदवार सुभाष जामदार म्हणाले, आमदार विनय कोरे यांनी माझ्यावर फार मोठी जबाबदारी सोपवली आहे.मी ती जबाबदारी दिल्या पार पाडण्याचा प्रयत्न करीन.मी गोकुळ दुध संघात नोकरी करत असल्याने सहकारी संस्थेत कसा कारभार करायचा हे मला चांगलेच ज्ञात आहे.माझे राजकीय गुरू माझे मामा आदरणीय कै.आनंदराव पाटील भेडसगावकर यांनी मला राजकारणाचे धडे दिले आहेत.‌शेतकरी संघाच्या माध्यमातून मी शाहुवाडी तालुक्यातील दुध संस्था व विकास सहकारी संस्था यासाठी विशेष योगदान देणार आहे.तसेच माझ्या गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे.जिल्यातील दुध संस्था व विकास सहकारी सोसायट्या यांच्याशी माझा गोकुळ दुध संघाच्या माध्यमातून निकटचा संबंध आहे.त्यामुळे माझा विजय निश्चित आहे.माझ्या उमेदवारीसाठी गोकुळ दुध संघाचे संचालक करण गायकवाड,के.डी.सी.बॅंकेचे माजी संचालक सर्जेराव पाटील पेरीडकर तसेच नेर्ले गावचे कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. नेर्ले गावचे माजी उपसरपंच आनंदराव जामदार यांनी गावकऱ्यांच्यावतीने सुभाष जामदार यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास माजी सरपंच सचिन पाटील, शिवाजी पाटील, पांडुरंग डांगे, घनश्याम पाटील,बबन दिंडे, अर्जून दिंडे, त्यांचे बंधू अशोक जामदार, राजेंद्र जामदार,उमेश पाटील तसेच गावातील इतर मान्यवरही उपस्थित होते.शेवटी उमेदवार सुभाष जामदार यांनी सर्व मान्यवर व उपस्थित गावकऱ्यांचे आभार मानले.