साताऱ्यात काकाकडूंन पुतणीवर बलात्कार, पुतणी गरोदर, काकावर गुन्हा दाखल,

साताऱ्यात काकाकडूंन पुतणीवर बलात्कार, पुतणी गरोदर, काकावर गुन्हा दाखल,

संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी ( सातारा जिल्हा )

सातारा शहरांतील एका १७ वर्षीय पुतणीवर वारंवार अत्याचार करुन तिला गरोदर ठेवल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात काकावर पोस्कोंचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना जून २०२३ ते १४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत घडली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन पीडित युवती ही सातारा शहरात वास्तव्यांस आहे.पीडितेच्या चुलत काकाने राहत्या घरात कोणी नसताना पीडितेवर अत्याचार केला. त्यातून पीडित युवती गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार तू कोणाला सांगितलास तर तुला मारुन टाकीन, तुमचे घर जाळून टाकीन अशी धमकी देखील काकांने दिली होती. त्यामुळे युवतीने हा प्रकार काही दिवस घरात कोणाला सांगितला नव्हता. मात्र गरोदर राहिल्याचे समजल्यानंतर तिने हा प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर घरच्यांनी पीडितेला घेवुन सातारा शहर पोलीस ठाणे गाठले शुक्रवारी रात्री उशिरा सातारा शहर पोलीस ठाण्यात चुलत काका विरोधांत पीडित युवतीने तक्रार दिली. अधिक तपास सातारा शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शितोळे करीत आहेत.