डॉक्टर अशोक माळी फाउंडेशन तर्फे विविध पुरस्कारांचे वितरण
डॉक्टर अशोक माळी फाउंडेशन तर्फे विविध पुरस्कारांचे वितरण
सांगली प्रतिनिधी अशोक मासाळ
आज दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी डॉक्टर अशोक माळी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे भव्य उद्घाटन श्रीराम पचिंद्रे कार्यकारी संपादक दैनिक पुढारी यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर अशोक माळी फाउंडेशन तर्फे अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार आज देण्यात आले ते पुरस्कार पुढीलप्रमाणे मानवता पुरस्कार ,ध्रुव पुरस्कार, ज्ञानज्योत पुरस्कार ,उद्योग रत्न पुरस्कार ,युवा उद्योजक, मिस इंडिया, दीपस्तंभ इतर स्पर्धा परीक्षा यशवंत, क्रीडा, आधारस्तंभ, अशा प्रकारे विविध क्षेत्रात नावलौकिक करणाऱ्या व्यक्तींना डॉक्टर अशोक माळी फाउंडेशन तर्फे विविध पुरस्कार वाटप करण्यात आले.
डॉक्टर अशोक माळी एक सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ म्हणून त्यांची सांगली जिल्ह्यात ओळख आहे डॉक्टर अशोक माळी यांनी वैद्यकीयसेवे बरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी फाउंडेशन ची निर्मिती केली आहे त्यांनी आपल्या या फाउंडेशनच्या वतीने महापुरामध्ये बरीच गावे पाण्याखाली गेली होती त्या ठिकाणी असलेल्या लोकांचे जीवन उध्वस्त झाले होते अशावेळी डॉक्टर माळी आणि त्या गावांची पाहणी करून गावपातळीवर अनेकांचे उध्वस्त झालेले संसार सावरण्यासाठी त्यांनी अर्जुनवाड गावाची निवड केली होती. प्रत्यक्ष पाहणी करून मदतीचा हात दिला होता. दलित वस्तीत शासनाची कोणतीही मदत पोहोचली नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने जीवनावश्यक वस्तू घरोघरी जाऊन पोच केल्या होत्या. ज्यांचा संसार उध्वस्त झाला आहे अशा लोकांशी संवाद साधून त्यांना धीर देत म्हणत होते जीवनात अनेक संकटी येत असतात त्यांना न घाबरता धैर्याने तोंड दिले पाहिजे महापौर हे आपल्यासाठी आलेले एक संकट आहे त्यामुळे आपले सर्वस्व गेले नाही आपण जिवंत आहोत यातून पुन्हा एकदा ताकतीने उभा राहूया आणि सकारात्मक जीवन जगूया खचून जाऊ नका खंबीरपणे उभा राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा प्रकारे लोकांना आधार देत लोकांना निर्धास्त जगण्याचा मार्ग आपल्या विचारातून ते दाखवत होते व एक उभारी देण्याचे काम त्यांनी केलेलं होतं.
डॉक्टर अशोक माळी फाउंडेशन तर्फे ज्या इंग्लिश मीडियम शाळा व कॉलेज निर्माण केले आहे त्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे या शाळेत इंग्रजी बरोबर मराठी हिंदी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मुलांना शिकवले जाते शाळेच्या नियमानुसार दोन दिवस इंग्रजी दोन दिवस मराठी दोन दिवस हिंदी या तिन्ही भाषा शाळेच्या आवारात मुलांच्या मध्ये बोलल्या जातात त्यामुळे कोणत्याही भाषेपासून मुलं वंचित राहणार नाहीत याची काळजी या शाळेने निश्चितच घेतलेली आहे
या कार्यक्रमास मिरज पूर्व भागातील बरेच प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती तसेच विद्यार्थ्यांचे माता पालक वर्ग सुद्धा मोठ्या भव्य संख्येने उपस्थित होतात. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक सिद्राम माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री रामचंद्र चव्हाण यांनी मांडले.
उपस्थिती सर्व लोकांना स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली होती.
अशाप्रकारे हा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला.