कोल्हापूरमध्ये दहशतवादी संघटना ऍक्टिव्ह; तिघांना अटक

कोल्हापूरमध्ये दहशतवादी संघटना ऍक्टिव्ह; तिघांना अटक
कोल्हापुरात NIA ची मोठी कारवाई

माझा महाराष्ट्र / वेब टीम१५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर देशात ठिकठिकाणी खळबळ माजवण्यासाठी दहशतवादी संघटना सक्रीय होत आहेत. दरम्यान आता कोल्हापुरातही दहशतवादी संघटना अक्टिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापुरात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA कडून कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी आणि हुपरी शहरात छापे टाकण्यात आले. या कारवाईमध्ये तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून काही महत्त्वाची कागदपत्रे, लोखंडी शस्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या आहेत.

एनआयने शनिवार दि. 12 ऑगस्ट रोजी कोल्हापूर आणि नाशिकसह देशातील पाच राज्यात 14 ठिकाणी छापे टाकले होते. या कारवाईमुळे कोल्हापुरातील संशयितांचे दहशतवादी संघटनांशी असलेले लागेदोरे समोर येत आहेत.