त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने घेतला महत्त्वाचा निर्णय

माझा महाराष्ट्र / वेब टीम
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून 15 सप्टेंबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद राहणार आहे.
अधिक मासानिमित्त त्र्यंबकेश्वरला महादेवाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविकांची गर्दी होत आहे. त्यातच व्हीआयपी दर्शनामुळे सामान्य भाविकांना फटका बसत असल्याचे निदर्शनास येत होते. याच पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे. मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले असले तरी केंद्र आणि राज्य स्तरावरील राजशिष्टाचार म्हणून येणाऱ्या व्हीआयपी पाहुण्यांना दर्शन दिले जाणार आहे.