सांगली जिल्ह्यातील उमदी येथे दोनशे मुलांना विषबाधा

जत तालुक्यातील उमदी येथील समता आश्रम शाळेतील मुलांना विषबाधा

सांगली जिल्ह्यातील उमदी येथे दोनशे मुलांना विषबाधा
सांगली जिल्ह्यात दोनशे मुलांना विषबाधा

सांगली / प्रतिनिधी 


सांगली जिल्ह्यातील उमदी येथील समता आश्रम शाळेतील दीडशे ते दोनशे मुलांना विषबाधा झाल्याची बातमी समोर आली आहे.

जत तालुक्यातील उमदी गावात विमुक्त आणि भटक्या जमाती प्रवर्गातील समता अनुदानित आश्रमशाळा आहे. या शाळेत २०० विद्यार्थी आहेत. रविवारी एका ठिकाणी डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात शिल्लक राहिलेले जेवण आणि बासुंदी देण्यात आली. हे जेवण जेवल्यावर मुलांना काही वेळाने उलट्या मळमळ सुरू झाली. तब्बल १७० मुले अचानक आजारी पडल्याने आश्रमशाळा प्रशासन देखील हादरले. विद्यार्थ्यांना त्रास सुरू होताच त्यांना तातडीने माडग्याळ व जत येथील रुग्णालण्यात उपचारासाठी हलविण्यात आले. समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी सदर घटनेची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून २४ तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.