ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड

माझा महाराष्ट्र / वेब टीम

मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज निधन झाले. वयाच्या ८१ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

सीमा देव यांनी वडिलांचे छत्र हरवल्याने आईला मदत म्हणून चित्रपटातून नृत्य सादर करण्यास सुरुवात केली होती. आलिया भोगासी हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. या पहिल्याच चित्रपटातून त्या रमेश देव यांच्या बहिणीच्या भूमिकेत झळकल्या होत्या. त्यानंतर पडछाया चित्रपटात त्या रमेश देव यांच्यासोबत मुलीच्या भूमिकेत दिसल्या. ग्यानबा तुकाराम या चित्रपटात दोघेही पुन्हा एकत्र झळकले होते. त्यांच्या जाण्याने मराठी तसेच हिंदी सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षभरापासून वयोमानानुसार त्यांची प्रकृती ठीक नव्हती. शिवाय त्यांना अल्झायमर या आजाराचेही निदान झाले होते. आज त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.