ए एस ट्रेडर्सचा मुख्य सुत्रधार पोलिसांच्या ताब्यात

ए एस ट्रेडर्सचा मुख्य सुत्रधार पोलिसांच्या ताब्यात

ए एस ट्रेडर्सचा मुख्य सुत्रधार पोलिसांच्या ताब्यात
ए एस ट्रेडर्सचा मुख्य सुत्रधार लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार याला अटक

कोल्हापूर / प्रतिनिधी

शेअर मार्केटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो गुंतवणूकदारांची कोट्यावधीची फसवणूक करणाऱ्या ए एस ट्रेडर्सच्या मुख्य सुत्रधाराला आज गुन्हे अन्वेषण शाखेच्या विभागाने अटक केली. लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार याला आज गुन्हे अन्वेषण शाखेच्या विभागाने आज पहाटे ताब्यात घेतल आहे.

लोहितसिंग सुभेदार आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी मिळून कोल्हापुरात ए एस ट्रेडर्स नावाने कंपनी सुरू केली होती. यातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोल्हापूरसह इतर ठिकाणच्या गुंतवणुकदारांकडून कोट्यवधी रुपये त्यांनी गोळा केले. सुरुवातीला या कंपनीकडून लोकांना मासिक परतावा मिळत होता. परंतु काही कालावधी गेल्यानंतर परतावा येणे बंद झाले. यामुळे ए एस ट्रेडर्सच्या गुंतवणूकदारांनी एकत्र येत 25 नोव्हेंबर 2022 ला शाहूपुरी पोलीस ठाण्यात लोहितसिंग सुभेदारसह एकूण 28 संचालकांवर फिर्याद दाखल केली. आत्तापर्यंत ए एस ट्रेडस आणि संलग्न कंपनीच्या संचालक आणि एजंट अशा एकूण 8 जणांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. मात्र, ए एस ट्रेडर्सचा प्रमुख लोहितसिंग सुभेदार गेल्या वर्षभरापासून फरार होता. अखेर आज त्याला ताब्यात घेण्यात आले.