पुण्यात विधवा महिलेकडून १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

पुण्यात विधवा महिलेकडून १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
पुण्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

माझा महाराष्ट्र / वेब टीम

पुण्यात एका विधवा महिलेने १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

अंजली असं अत्याचार आरोपी महिलेचे नाव आहे. पीडित १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा आरोपी महिलेच्या घराजवळ राहतो. महिलेच्या नवऱ्याचा कोरोनामध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर महिलेने या मुलाला शरीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. महिलेने याचा व्हिडीओ देखील शूट केला. त्यानंतर त्याला धमकी देत वारंवार मुलावर अत्याचार केले. या प्रकरणी सदर महिलेवर कोंढवा पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.