मोठ्या भावानेच सुपारी देत केली लहान भावाची हत्या

मोठ्या भावानेच सुपारी देत केली लहान भावाची हत्या
मोठ्या भावानेच सुपारी देत केली लहान भावाची हत्या

माझा महाराष्ट्र / वेब टीम

एका आर्थिक वादातून मोठ्या भावाने लहान भावाला जीवे मारण्याची सुपारी देत हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. 

याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी इरफान युनूस नमकवाला या मोठ्या भावाला अटक केली आहे. आरोपीने खून करण्यासाठी नेपाळमधील एका कुख्यात गुंडाला सुपारी दिली होती. त्याच्याकडे हे काम झाले नाही तर खबरदारी म्हणून त्याने आणखी दोघांना नेमले होते. लोकेंद्र उदयसिंग रावत, इस्लाम अस्लम कुरेशी, सलीम मन्सूर शेख अशी याप्रकरणातील आरोपींची नावे आहे. या सर्वांना अटक करण्यात आली आहे. 

हे दोघेही भाऊ ग्रँट रोड येथील लॅमिंग्टन रोड येथे इलेक्ट्रॉनिक दुकान चालवत होते. मात्र, जेव्हा इम्रानचा व्यवसाय भरभराटीला येऊ लागला तेव्हा मोठा भाऊ त्याची प्रगती पाहून जळत होता. त्यांच्यात आर्थिक वादही होत होते. यातूनच लहान भावाचा काटा काढण्याच्या उद्देशाने त्याने ही सुपारी दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे.