बरगेवाडी परिसरात बाप्पाचे जल्लोषात आगमन
लाडक्या बाप्पाचे जल्लोषात आगमन

संदीप बरगे / बरगेवाडी
लाडक्या गणरायाचे राधानगरी तालुक्यातील बरगेवाडी कौलव, घोटवडे, भोपळवाडी, पिंपळवाडी परिसरात जल्लोषात आगमन झाले. सकाळी सात वाजल्यापासूनच भाविकांनी गणेशमूर्ती घेण्यासाठी कुंभार बांधवांकडे गर्दी केली होती.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या घोषणांनी परिसर दणादूण गेला होता. गणपती घेण्यासाठी वडिलधाऱ्यांसह लहान मुलेही अग्रेसर दिसत होती. गणेशभक्तांनी गणरायाला नेण्यासाठी दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर केला होता. घरोघरी अकरापर्यंत गणपतीची प्रतिष्ठान झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.
आज पावसाने थोडीफार हजरी लावल्यामुळे गणपती घेण्यासाठी आलेल्या भाविकांनी लाडक्या गणपतीला पावसापासून वाचवण्यासाठी छत्रीचा आधार घ्यावा लागला. दुपारी दोननंतर सार्वजनिक मंडळांच्या गणरायाचे लेझीम पथक, झांज पथकच्या गजरात आगमन झाले.
बरगेवाडी येथे हनुमान तालीम मंडळाने पारंपारिक वाद्याच्या लेझीम पथकच्या गजरात तसेच सुहासिनी तसेच इतर महिलांनी फुगडीचा ठेका धरत गणेशाच्या आगमन मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. जय गणेश तरुण मंडळांने श्री ज्ञानेश्वरी माऊली मंडळ चंद्रे या सोळ्याने गणेशाचे आगमन केले.