महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर आरक्षण द्या; ‘या’ मराठा नेत्याचा सरकारला इशारा

महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर तातडीने आरक्षण द्या

महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर आरक्षण द्या; ‘या’ मराठा नेत्याचा सरकारला इशारा
महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर तातडीने आरक्षण द्या

माझा महाराष्ट्र / वेब टीम

महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नसेल तर मराठ्यांना आरक्षण द्या असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी दिला आहे. नागपूर येथे झालेल्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

आरक्षणची मर्यादा वाढवणे हे राज्य सरकारच्या हातात नाही हे आम्हाला माहिती आहे. परंतु राज्यातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीत जावं, हवं तर त्यांचे तिकीट मी काढतो. तिथे मोदींना सांगावे, आम्हाला महाराष्ट्राचा मणिपूर करायचा नाही. ताबोडतोब मर्यादा वाढवा आणि आम्हाला आरक्षण द्या, आता ओबीसी समाजही उपोषणाला बसला आहे. त्यांचा बोलविता धनी कोण आहे? दोन समाजात फूट पाडण्याचा काहींचा राजकीय प्रयत्न असल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे. 

सामाजिक संतुलन बिघडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ओबीसी संघटनांची असेल 

मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर सरसकट द्या, कुणबी वैगेरे शोधत काय बसता? ओबीसींचे आंदोलन हा एक राजकीय स्टंट आहे. आम्ही ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मागितले नाही. आम्ही फक्त आरक्षणाची मागणी करत आहोत. त्यासाठी तुम्ही कशाला रस्त्यावर उतरताय? तुम्ही रस्त्यावर उतरणार असाल तुम्ही दुसऱ्यासाठी काम करत असाल यामुळे सामाजिक संतुलन बिघडले तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही ओबीसी संघटनांवर असेल असेही दिलीप जगताप यांनी यावेळी सांगितले.