प्रा. डॉ. एन. डी .पाटील महाविद्यालयात ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमाचे उद्घाटन
प्रा. डॉ. एन. डी .पाटील महाविद्यालयात ‘मेरी माटी, मेरा देश’ उपक्रमाचे उद्घाटन

रोहित पास्ते / मलकापूर प्रतिनिधी
मलकापूर पेरीड येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात भारताच्या अमृतमहोत्सवाच्यानिमित्ताने स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना नमन करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने ‘मेरी माटी, मेरा देश’, ‘मिट्टी को नमन, वीरों को वंदन’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील एक मूठ माती कॉलेजमध्ये ठेवलेल्या कलशात टाकली. सदर उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एन. घोलप यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. डॉ. एस.पी. बनसोडे यांनी केले. उपप्राचार्य डॉ. एन. एस. आडनाईक, डॉ. बी. ए. सुतार उपस्थित होते. सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.