विराट कोहलीचा जगातील ‘या’ खेळाडूंच्या यादीत समावेश

विराट कोहलीचा जगातील ‘या’ खेळाडूंच्या यादीत समावेश
सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचा समावेश

माझा महाराष्ट्र / वेब टीमजगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत भारताच्या विराट कोहलीचा समावेश झाला आहे. सध्या विराट कोहलीची एकूण संपत्ती 1050 कोटी आहे. तो एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी 8.9 कोटी रुपये घेतो, तर एका ट्विटर पोस्टसाठी 2.5 कोटी रुपये घेतो. याशिवाय तो एका दिवसाच्या जाहिरातीतून 7.50 कोटी ते 10 कोटी रुपये कमावतो. 

विराट 18 पेक्षा जास्त ब्रँड्सचा अॅम्बेसेडर आहे. तसेच विराट कोहलीचे गुरुग्राम आणि मुंबई इथे आलिशान घर आहे. कोहलीने ब्लू ट्राइब, युनिव्हर्सल स्पोर्ट्सबिझ, एमपीएल, स्पोर्ट्स कॉन्व्हो, डिजिट इत्यादी स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. विराट कोहलीच्या गुरुग्राममधील घराची किंमत जवळपास 34 कोटी रुपये तर मुंबईतील आलिशान घराची किंमत जवळपास 80 कोटी रुपये आहे. त्यामुळे विराट कोहली हा भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू असल्याचे मानले जाते.