मराठा आरक्षण : उपोषणाबाबत मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय
मराठा आरक्षण : उपोषणाबाबत मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय

माझा महाराष्ट्र / वेब टीम
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे अशी विनंती करण्यात आली. त्यानंतर आज मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सरकारला आम्ही ४० वर्षे दिले. आता ते एक महिना मागत आहेत. पण त्यांना वेळ कशासाठी हवी आहे, असा प्रश्न उपस्थित करत जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, सरकारचे तसे पत्र जोपर्यंत माझ्या हातात येत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे सांगत त्यांनी सरकारला एक महिन्यांची मुदत दिली आहे. जोपर्यंत मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, तोपर्यंत आंदोलन स्थळावरून घरी परतणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे.
मराठा आरक्षणाबाबत सरकारने एका दिवसात जीआर काढला पण तो न्यायालयात टिकणारा नाही. महिन्याचा वेळ दिला तर न्यायलयात टिकणारे आरक्षण देणार का? अशी प्रश्न त्यांनी सरकारला केला आहे. तसेच आरक्षणाचे पत्र हातात मिळेपर्यंत मी घरी जाणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.