मराठा आरक्षण : मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली आपली भूमिका

मनोज जरांगे पाटील यांनी घेतली पुढील भूमिका

मराठा आरक्षण : मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली आपली भूमिका
मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय तपासणीला दिला नकार

माझा महाराष्ट्र / वेब टीम

जालना येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय तपासणीला नकार दिला आहे. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या १४ दिवसांपासून जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. राज्य सरकारकडून वारंवार उपोषण मागे घ्यावे असे आवाहन त्यांना करण्यात येत आहे. मात्र, जरांगे पाटील हे आपल्या भूमिकेवर ठाम असून आज त्यांनी वैद्यकीय तपासणीलाही नकार दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी चार दिवसांत सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर पाणी आणि औषधांचा त्याग करण्याचा इशारा देत राज्य सरकारला चार दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतरही सरकारने कोणतेही ठोक पाऊल न उचलल्याने त्यांनी औषधं घेण्यास नकार दिला असून डॉक्टरांनी लावलेल्या सलाईनदेखील काढून टाकल्या आहेत. मराठा आरक्षणाचा जीआर आल्यानंतरच तपासणी आणि उपचार घेणार असल्याची भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.