किमान आमदारांना विश्वासात घेण्याची अपेक्षा : आ. सतेज पाटील

आमदारांना विश्वासात घेणे गरजेच : आ. सतेज पाटील

किमान आमदारांना विश्वासात घेण्याची अपेक्षा : आ. सतेज पाटील
आमदारांना विश्वासात घेणे गरजेच : आ. सतेज पाटील

माझा महाराष्ट्र / वेब टीम

विकास आराखडा तयार करत असताना शहरातील आमदारांना विश्वासात घेणे गरजेचे असल्याचे मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले आहे.

कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर हे सध्या अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा विकास आराखडा कसा आहे तो दाखवावा, तो तयार करत असताना किमान शहरातील आमदारांना विश्वासात तरी घ्यावे, अशी अपेक्षा सतेज पाटील यांनी व्यक्त केली.

कोल्हापूरचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला विश्वासात घ्या. कोल्हापुरातील लोकशाही अबाधित राहण्यासाठी मदत होईल, असा टोलाही सतेज पाटील यांनी पालकमंत्र्यांना लगावला आहे. 

विकास आराखड्याची माहिती आमदारांनाही दिली जात नाही 

आम्ही या मातीत जन्माला आलो आहे. त्यामुळे येथील समस्या आम्हाला चांगल्या पध्दतीने कळतात. विकास आराखडा कसा करत आहेत याची माहिती आम्हा आमदारांनाही दिली जात नाहीत. प्रशासनाकडे विचारणा केली तरीही माहिती दिली गेली नाही. त्यासाठी आता तिन्ही आमदारांना लेखी पत्र देण्याची वेळ आली आहे, असे आमदार पाटील म्हणाले.