न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर विद्यालयात वाचनकट्ट्याचे उद्घाटन

न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर विद्यालयात वाचनकट्ट्याचे उद्घाटन

न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर विद्यालयात वाचनकट्ट्याचे उद्घाटन
वाचनकट्ट्याचे उद्घाटन

नारायण लोहार / सिंधुदुर्ग प्रतिनिधी 


सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर येथे आज दि. 11 सप्टेंबर रोजी मुख्याध्यापक दिलीप शेवाळकर यांच्या हस्ते वाचनकट्याचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक दिलीप शेवाळकर यांनी वाचन कट्याचे महत्व तसेच वाचनाचे फायदे सांगितले. ते म्हणाले की, वाचन संस्कृतीमुळे आपल्याला आत्मविश्वासाने आपले विचार मांडता येतात. तसेच शिक्षिका उज्ज्वला निकम यांनीही वाचनकट्याबद्दल आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास विद्यालयाचे शिक्षक नारायण लोहार, समिर नाईक, अदिती ढवळे, सृष्टी वारंग आणि गाडगीळ सर उपस्थित होते. तसेच इयत्ता 5 वी ते 10 वीचे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.