Shashank Ketkar: शशांक केतकर पुन्हा एकदा बनणार 'बाप'

Shashank Ketkar: शशांक केतकर पुन्हा एकदा बनणार 'बाप'

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : मराठी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकरने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याच्या सगळ्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 

ही गुडन्यूज म्हणजे शशांक केतकर  पुन्हा एकदा बाबा होणार आहे. त्याची पत्नी प्रियांका ढवळे गरोदर असून हे जोडपं या नवीन वर्षात त्यांच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार आहे. पत्नी आणि अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर फॅमिली फोटो शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून अभिनेत्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

२०२१ मध्ये पहिल्या बाळाचा जन्म 

चित्रपट, नाटक, मालिका, वेबसीरिज अशा चारही माध्यमांमध्ये अभिनेता शशांक केतकरने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या अभिनेता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शशांकचे  ४ डिसेंबर २०१७ मध्ये त्याची मैत्रीण प्रियांका ढवळेबरोबर लग्न झाले. यानंतर शशांक आणि प्रियांका यांनी २ 0२१ मध्ये त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आणि त्याचे आनंदाने स्वागत केले. अभिनेत्याच्या मोठ्या मुलाचं नाव ऋग्वेद आहे. 

अभिनेता शशांकने ही पोस्ट शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “२०२५ चं स्वागत यापेक्षा छान बातमीनं होऊच शकत नाही. आम्ही पुन्हा एकदा आई-बाबा होणार, ऋग्वेद दादा होणार आणि आमचे आई बाबा पुन्हा एकदा आजी आजोबा होणार यासाठी आम्ही तयार आहोत.” असे लिहून अभिनेत्याने ही गोड बातमी शेअर केली आहे.