कर्नाटक सीमेवर वाद चिघळणार ?

कर्नाटक सीमेवर वाद चिघळणार ?

कोल्हापूर : आज बेळगावात  महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा आयोजित केला होता, मात्र पोलिसांनी या मेळाव्याला परवानगी नाकारली आहे. बेळगावात जाणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या प्रत्येक सीमेवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील  नेत्यांना बेळगावात येण्यास बंदी घातल्याने वाद चिघळण्याची चिन्हे आहेत . 

काहीही झाले तरी महामेळावा घेण्याचा महाराष्ट्र एकीकरण समितीचा  निर्धार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्यने बेळगावला  रवाना  झाले आहेत. कार्यकर्तेही आता आक्रमक झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर सीमेवर असलेल्या  टोल नाक्यावर कार्यकर्ते मोठ्या संख्येने येणार असल्याने आणि आक्रमक असल्याने तेथे मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.