कॉम्रेड गोविंदराव पानसरे स्मारकाचे 20 फेब्रुवारीला लोकार्पण, सतेज पाटील यांनी केली पाहणी..

कॉम्रेड गोविंदराव पानसरे स्मारकाचे 20 फेब्रुवारीला लोकार्पण, सतेज पाटील यांनी केली पाहणी..

              कोल्हापुरातील प्रतिभानगर येथील महानगरपालिकेच्या वि. स. खांडेकर शाळेजवळ अडीच हजार चौरस फुटांच्या जागेत कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचे स्मारक उभारण्यात येत असलेल्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या स्मारकासाठी महानगरपालिकेकडून 40 लाख रुपयांचा निधी तर आमदार सतेज पाटील यांनी 30 लाखाचा मिळवून दिला. 

              आमदार सतेज पाटील यांनी प्रतिभानगर येथील स्मारकाच्या कामाची पाहणी केली. येत्या 20 फेब्रुवारी रोजी कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या स्मृतीदिनी या स्मारकाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे आम. सतेज पाटील यांनी सांगितले. तसेच स्मारकाची उर्वरीत कामे तात्काळ पूर्ण करावीत. अशा सूचना माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी महापालिकेचे अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर आणि आर्किटेक्ट यांना दिल्या.

           20 फेब्रुवारीच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी उद्यमनगर येथे बैठक आयोजित करण्यात आली यावेळी आमदार पाटील यांनी स्मारक समितीच्या प्रतिनिधीसह स्मारकाच्या कामाची पाहणी केली.

        यावेळी कॉम्रेड दिलीप पवार,कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, महानगरपालिकेचे उपशहर अभियंता सतीश फप्पे, महादेव फुलारी, काकासो पाटील, डॉ अजित राजीगरे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते .