माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

कोल्हापूर - माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचा वाढदिवस मंगळवारी विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. तालुका, जिल्हा व राज्यस्तरावरील नेतेमंडळी, मंत्री, लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी त्यांना मोबाईलद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला. संजय घाटगे यांच्या कुटुंबियांनी केक कापून औक्षण करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत पाटील, खा. धनंजय महाडिक, माजी खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, अरुण इंगवले, दत्ताजीराव घाटगे, युवराज पाटील, भैया माने आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी घाटगे यांना मोबाईलद्वारे शुभेच्छा दिल्या.

वाढदिसानिमित्त साके, व्हनाळी, केंबळी, बेलवळे परिसरात शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, वृक्षारोपण, शालेय साहित्य वितरण झाले. व्हनाळी येथील शाळेत सरपंच दिलीप कडवे, उपसरपंच ओंकार कौदाडे, सूर्यकांत मर्दान, मुख्याध्यापक बाळासाहेब खामकर यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले. उपसरपंच ओंकार कौंदाडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सूर्यकांत मर्दाने, दिलीप हातकर, संजय निचिते, श्रीपती वाडकर, अरुण पोवार, पोपट वाडकर, पांडुरंग कौंदाडे उपस्थित होते. स्वागत महादेव गुरव तर बाळासाहेब खामकर यांनी आभार मानले. 

विद्या मंदिर साके व कै. सौ. सुभद्रामाता आशीर्वाद विद्यालय तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना फळे, खाऊचे वाटप अशोक पाटील, संजय सुतार, उपसरपंच संपदा पाटील, युवराज पाटील, सुजय घराळ, रवींद्र जाधव यांच्या हस्ते झाले. संजय घाटगे यांचा जीवनपट स्क्रीनवर दाखवण्यात आला. कार्यक्रमास रंगराव चौगले, नामदेव करडे, बाळासो पाटील, तानाजी पाटील, ग्रामसेवक संजय पाटील, ज्ञानदेव पाटील, विकास पाटील, सागर पाटील, मुख्याध्यापक भानुदास पोवार, दत्तात्रय ससे उपस्थित होते. मोहन गिरी यांनी स्वागत केले. सुजय घराळ यांनी आभार मानले. केंबळी येथे विद्यार्थ्यांना माजी उपसरपंच आर. के. कुंभार, अध्यक्ष विठ्ठल पाटील, माजी चेअरमन एम. एम. पाटील, सागर पाटील यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले.