संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला महाराष्ट्रातील नंबर वन स्कूलचा किताब

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला महाराष्ट्रातील नंबर वन स्कूलचा किताब

हातकणंगले (प्रतिनिधी) : अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल ने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत 'एज्युकेशन वर्ल्ड' संस्थेमार्फत महाराष्ट्रातील व कोल्हापूर जिल्ह्यातील डे कम बोर्डिंग विभागातील नंबर वन स्कूलचा किताब मिळवला आहे. दिल्ली-गुडगाव येथे झालेल्या शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संजय घोडावत शिक्षण संकुलाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराच्या निमित्ताने त्यांनी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती यांच्या नेतृत्वाखालील उत्कृष्ट कार्याची प्रशंसा केली. त्यांनी म्हटले की, "प्राचार्या मोहंती यांच्या कुशल व्यवस्थापनामुळेच शाळेला हा गौरव मिळाला आहे."

या प्रसंगी बोलताना प्राचार्या सस्मिता मोहंती म्हणाल्या, "विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळेच हा पुरस्कार मिळाला आहे. अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, नवोपक्रम, उत्कृष्ट निकाल, आणि शिक्षकांचे समर्पण, प्रायोगिक शिक्षणपद्धती, उच्च शिक्षित शिक्षक, जागतिक दर्जाचे शिक्षण  या सर्व गोष्टींमुळे आम्ही हे यश प्राप्त करू शकलो."

चेअरमन संजय घोडावत आणि विश्वस्त विनायक भोसले यांनी प्राचार्या मोहंती यांच्या शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच, बोर्डिंग प्राचार्य डॉ. एच. एम. नवीन, ज्यु कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे, डे बोर्डिंग स्कूलचे प्राचार्य अस्कर अली, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, आणि पालकांचेही त्यांनी आभार मानले.