विकासात्मक कामांसह परिसराला देणार विधायक ओळख - अमल महाडिक
कोल्हापूर ( प्रतिनिधी) : परिसरातील मूलभूत सुविधांसाठी कामे तर करूच पण सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आवश्यक अशा विकासात्मक कामांसह परिसराला विधायक ओळख देणार आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांनी केले.
"सम्राट नगर, जागृती नगर व दौलत नगर परिसरात आयोजित प्रचार पदयात्रेत ते बोलत होते. माझ्या मतदारसंघाचा भौतिक विकास करण्यासाठी मी तत्पर आहे. यासोबतच येथील नागरिकांच्या वैयक्तिक विकासासाठी विविध उपक्रम राबवणार आहे. येथील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी मी कटिबद्ध आहे." असे त्यांनी यावेळी सांगितले.
"या परिसरात बहुतांशी अपार्टमेंट आहेत. मोठ्या प्रमाणात सांडपाणी व्यवस्थापन समस्या याठिकाणी आहे. याशिवाय कचरा व्यवस्थापन देखील होत नाही. या सर्व समस्या प्रामुख्याने सोडविण्यासाठी मी आजवर प्रयत्न केले आहेतच. निवडून आल्यावर देखील पहिल्या दिवसापासून काम सुरु करणार आहे. तुमची सोबत व तुमचा विश्वास माझ्या सोबत आहे. त्यामुळेच तुमचे काम करत राहण्याची खात्री देतो आहे." असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महायुती सरकारने महात्मा फुले जन आरोग्य, वयोश्री, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासह विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. सर्वत्र महायुतीचेच वारे आहे. पुन्हा एकदा प्रचंड मतांनी सरकार येणार आहे. त्यामुळे कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून मला मत द्या. हे मत विकासाला दिलेले मत आहे हे नक्की लक्षात ठेवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी या भागातील चौकांमध्ये फटाक्याची आतिषबाजी करून महाडिक यांचे स्वागत केले गेले. यावेळी त्यांनी गट पातळीवर जाऊन काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
याप्रसंगी विलास वास्कर, प्रशांत जोशी, बबन मोकाशी, संदीप पवार, इंग्रजीत शिंदे, हेमंत बापू पाटील, अजित नलावडे, अमर ढेरे, रीमा पालनकर, दिपाली पवार, वर्षा चौगुले, मयुरी रावण, सुभाष चिकोडीकर, विजय गायकवाड, राजू खाडे,
व्यंकटेश वास्कर, सुनील मोहिते , मधुकर मांडवकर , बबन मोकशी, हेमंत बापू पाटील, रघू पाटील, विनय शेटे, अथर्व कदम ,अमित इस्पूर्लिकर, विशाल पाटील, अजय कवडे, तानाजी मोरे , सुवर्णा कदम , निर्मला कापडे, पल्लवी मिरजकर ,गीताताई पाटील, अल्का वाघेला, सुरेश कुनुरकर, विक्रम धोत्रे, ओंकार दिंडे, अथर्व चौगले यासोबत जागृती नगर व दौलतनगर भागातील तरूण मंडळ नागरीक व कार्यर्कत्यांनी उदंड प्रतिसाद दिला.
याप्रसंगी स्थानिक नागरिकांसह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.