ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था संचलित कॅम कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर मध्ये डीसीपीटी या संगणक कोर्समध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
पुणे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव रणदिवे
दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी कॅम्प कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर मध्ये डी सी टी टी या संगणक कोर्समध्ये पन्नास होऊन अधिक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले होते या कोर्समध्ये 25 विद्यार्थी उत्तीर्ण झाले या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अतिशय उत्साहाने संपन्न झाला 21 वे शतक हे संगणकीय शतक म्हणून मानले जाते प्रत्येकाने संगणक प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज आहे म्हणून ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेने संगणक साक्षरता अभियान ही योजना गेल्या पाच वर्षापासून राबवत आहे विद्यार्थ्यांकडून नाम मात्र शुल्क तसेच गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचे महान कार्य या संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे म्हणून या संस्थेने कॅम कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर ही संगणक प्रशिक्षण संस्था दौंड शहर तालुक्यामध्ये अतिशय उत्तम प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून प्रचलित आहे.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डीसीटीटी हा एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स अल्फी दरामध्ये विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण दिले गेले दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला डीसीटीटी या एका वर्षाच्या कोर्समध्ये प्रथम क्रमांक अश्विनी प्रवीण होले, द्वितीय क्रमांक जयेश संजय बराटे,तृतीय क्रमांक शिवानी अंकुश वनवे या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच या कोर्समध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र पुष्पगुच्छ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले सोहळ्यासाठी प्रवीण होले गोपाळवाडी ग् ग्रामपंचायत सदस्य, सुशील सुखेजा,नागेश तायडे,महाराष्ट्र भूमीचे कार्यकारी संपादक पत्रकार विठ्ठल होले , एडवोकेट कांबळे साहेब दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस राजे भोसले साहेब, निमगाव खलु चे ग्रामपंचायत अधिकारी शिरसागर सर इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मानव चव्हाण, गायत्री थोरात,यश थोरात,ओम लोंढे या विद्यार्थी परिश्रम घेतले आलेल्या सर्व विद्यार्थी व पालकांचे स्वागत व आभार संस्थेचे संस्थापक सदाशिव रणदिवे सर यांनी केले तसेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सूत्रसंचालन प्रा. दिनेश पवार सर यांनी केले व सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या