प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयामध्ये एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयामध्ये एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयामध्ये एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
इंग्रजी विषयातील रोजगाराच्या संधी कार्यशाळा

रोहित पास्ते / मलकापूर प्रतिनिधी 

रयत शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयामध्ये इंग्रजी विभागाच्यावतीने एक  दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेस प्रा. डॉ. एस. ए. कदम, राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय, कोल्हापूर व प्रा. डॉ. डी. आर. नांगरे, श्री. शिव-शाहू महाविद्यालय, सरूड यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी इंग्रजी विषयातील रोजगाराच्या विविध संधी या विषयावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले. त्याचबरोबर आजच्या स्पर्धात्मक जगातील इंग्रजी या विषयाचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एन. घोलप होते. 

या एक दिवशीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन इंगजी विभागाकडून करण्यात आले. याप्रसंगी  कार्यशाळेचे प्रास्ताविक  व मान्यवरांचा  परीचय इंग्रजी विभागप्रमुख प्रा. एस. एन. चव्हाण यांनी केले तर प्रा. एस. के. शेख यांनी आभार मानले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. डी. डी. ढेरे यांनी केले. या कार्यशाळेस प्रा. श्रीमती एम. के. धुमाळ व महाविद्यालायातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.