राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत दिल्ली शैक्षणिक सहलीसाठी निवड झालेल्या चार विद्यार्थ्यांचा केंद्रप्रमुख श्रीमंत गंगावणे यांच्या हस्ते सत्कार

राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत दिल्ली शैक्षणिक सहलीसाठी निवड झालेल्या चार विद्यार्थ्यांचा केंद्रप्रमुख श्रीमंत गंगावणे यांच्या हस्ते सत्कार

रोहिलागड प्रतिनिधी

सन २०२२-२३ करिता राज्य समग्र शिक्षा अभियानाच्या राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत (एक्सपोजर व्हीजिट आऊटसाईड ऑफ स्टेट) या कार्यक्रमांतर्गत नुकत्याच झालेल्या विविध स्तरांवरील निवड चाचणी द्वारे येथील रोहिलागड ( तालुका अंबड) या केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौचलवाडीच्या चार विद्यार्थी- विद्यार्थिनींची माननीय उपायुक्त औरंगाबाद यांच्या आदेशान्वये माननीय जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक जालना यांच्याकडून जिल्ह्यामधून निवड करण्यात आली. रोहिलागड केंद्राच्या व शाळेच्या या उल्लेखनीय यशस्वी कार्याबद्दल रोहिलागड केंद्राचे केंद्रप्रमुख राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त श्रीमंत गंगावणे यांच्या हस्ते कु. देवयानी नारायण बैनाडे कु. अक्षरा अर्जुन गुसिंगे धनराज गजानन बारवाल आदित्य अंबर सिंग गुसिंगे या चार निवड पात्र विद्यार्थी- विद्यार्थिनींची व त्यांच्या पालकाचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सह्रदय सत्कार केला दिनांक नऊ एप्रिल ते तेरा एप्रिल या चार दिवशीय शैक्षणिक सहलीमध्ये विद्यार्थी जीवनामध्ये विज्ञान कला संस्कृती बाल वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवावा भारताच्या सांस्कृतिक शैक्षणिक ऐतिहासिक संप्रदायाची ओळख व्हावी व विद्यार्थी जीवनामध्ये निसर्ग जीवनाचा आनंद घेता यावा प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या विविध सांस्कृतिक परंपरांची ओळख व्हावी यासाठी विद्यार्थी दशेतील हा दिल्ली शैक्षणिक सहलवारीचा अनमोल खजाना ठरणार आहे.तसेच सारथी या संस्थेतर्फे नुकत्याच घेतलेल्या राजश्री शाहू महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेमध्ये कौचलवाडी येथिल तीन विद्यार्थी पात्र ठरल्याबद्दल त्या यशस्वी विद्यार्थी श्रुती गोकुळ चरावंडे प्रीती राजू नागलोत स्वाती महासिंग नागलोत यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन रोहिलागड केंद्राचे केंद्रप्रमुख राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त श्रीमंत गंगावणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष गोकुळ चरावंडे पालक गोपाल चरावंडे नारायण बैनाडे अर्जून गुसींगे गजानन बारवाल राजु नागलोत महासिंग नागलोत शाळेचे मुख्याध्यापक टकले मार्गदर्शक शिक्षक चव्हाण आग्रे छानवाल शेरखाने यांची उपस्थिती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधाकिसन चव्हाण सर यांनी तर आभार प्रमोद शेरखाने सर यांनी मानले याप्रसंगी विद्यार्थी पालकांना व शिक्षकांना केंद्राचे केंद्रप्रमुख राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त श्रीमंत गंगावणे यांनी तसेच शिक्षक श्री चव्हाण शेरखाने यांनी शासनपत्राच्या आधिन बाबींचे दक्षता काळजीपूर्वक नियोजन व पूर्वतयारी वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचना याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले व विद्यार्थींना शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व विद्यार्थी पालक शिक्षकवृंद यांची उपस्थिती होती रोहिलागड केंद्रातील सर्व शाळांच्या नावीन्यपूर्ण या अभिनव उपक्रमातील यशस्वी कार्याबद्दल बदनापूर तालुक्याचे विद्यमान आमदार नारायणराव कुचे रोहिलागड जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा सरचिटणीस अवधूत नाना खडके पाटील जालनाचे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगलताई तुपे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक विपुल भागवत उपशिक्षणाधिकारी प्राथमिक विनया वडजे जालना डायटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे जेष्ठ अधिव्याख्याता संजय येवते जेष्ठ अधिव्याख्याता जालिंदर बटुळे योगेश जाधव दीपक दराडे निपुण भारत माता पालक गटाच्या डायट जालना जिल्हा समन्वयक आदरणीय डॉ. प्रेरणा मोरे डायटचे विषय तज्ञ जगन वायाळ शिवाजी उगले गटशिक्षणाधिकारी गोविंदराव चव्हाण रोहिलागड केंद्राचे केंद्रप्रमुख राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त श्रीमंत गंगावणे अंबड संपर्कप्रमुख विनोद राख जालना समग्र शिक्षा अभियानाचे सुनील मावकर अंबड चे गट समन्वयक अशोक ढेरे सतीश देशमुख राठोड अशोक पवार म्हेत्रे मस्के वैष्णव दाणे रब्बानी शेख सर्व मुख्याध्यापक शिक्षक पालक यांनी अभिनंदन केले आहे यशाबद्दल जिल्हा तालुका व केंद्र रोहिलागड परिसरामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे