सदलगा येथे असंघटित बांधकाम मजुरांच्या संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन

सदलगा येथे असंघटित बांधकाम मजुरांच्या संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन

चिक्कोडी (प्रतिनिधी) : भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त सदलगा शहरातील जुन्या बसस्थानक आवारामध्ये सामाजिक कार्यकर्ते अझरुद्दीन शेख यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम कामगार व असंघटित बांधकाम कामगार या संयुक्त संघटनेच्या कार्यालयाचे मोठ्या थाटात उद्घाटन पार पडले.  यावेळी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र आदरांजली वाहण्यात आली.  नूतन कार्यालयाचे उद्घाटन सदलगा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शिवानंद भोसले, ठेकेदार सचिन बिंदगे, सदलगा नगरपालिकेचे नूतन व्यवस्थापक श्रीधरण, बांधकाम संघटनेचे सर्व सदस्य आणि अण्णासाहेब कदम, मकरंद द्रविड, बसवराज कोळी, पी बी गरदाळ, मल्हारी घोडके आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष अझरुद्दीन शेख म्हणाले, सदलगा शहरातील आश्रय कॉलनी मध्ये शुद्ध पेयजल यंत्रणा बसवण्यासाठी स्वतःची जागा उपलब्ध करून दिली असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर ग्रंथालय क्रीडांगण शालेय इमारती याविषयी देखील प्रस्तावित योजनेचा आराखडा देखील आवर्जून सांगितला. 

यावेळी हरीश हित्तलमणी, अब्बास मकानदार, आरिफ मुजावर, सद्दाम मणेयार, ऐश्वर्या लक्कनावर , गीता बोम्मनावर, आसिफ मुजावर, राजू वाली, प्रभू हवालदार, राजू देसाई, यांच्यासह अनेक बांधकाम कामगार इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.