सातारच्या धडाकेबाज पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब वाढदिवस विशेष... संपूर्ण जिल्ह्यांतून शुभेच्छांचा वर्षाव
संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी ( सातारा जिल्हा )
सातारा जिल्ह्याचे विद्यमान आणि धडाकेबाज जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख साहेब यांच्या वाढदिवसांच्या अनुषंगाने संपूर्ण सातारा जिल्हावासियांतून तसेच जिल्ह्याच्या संपूर्ण प्रशासनांतून तसेच पत्रकार अन् राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिंक अशा विविध संस्थातून जिल्हा पोलीस अधीक्षकांना शुभेच्छा कोणी समक्ष तर कोणी सोशल मीडियाच्या माध्यमांतून शुभेच्छा व्यक्त केल्या. सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी दिनांक २० ऑक्टोंबर २०२२ रोजी तत्कालीन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल यांच्या बदलीनंतर नक्षलग्रस्त म्हणून ओळख असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील उत्कृंष्ट सेवेनंतर शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पदाचा पदभार हाती घेतल्यापासून जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील, जिल्ह्यात अनेक मोठमोठे गुन्हे देखील उघडकीस, पोलीस अधीक्षक समीर शेख यांचा तसा पोलीस प्रशासनांत दबंग आणि धडाकेबाज आयपीएस अधिकारी म्हणून चांगलाच परिचय देखील आहे. यापूर्वींही जिल्ह्यांमध्ये ते सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून देखील काम पाहिले होते. त्यामुळे सातारा जिल्ह्याचा त्यांना चांगलाच अनुभव आहे. आणि त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक या पदावरुन सातारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक या पदावर पदोन्नतींने त्यांची नियुक्ती करण्यात आली. जवळपास वर्षभरांपासून त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी चांगलीच मोडीत काढली आहे. यापूर्वींच्याही पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चांगलेच प्रयत्नशील राहिले, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख साहेब यांनी देखील पदभार घेतल्यापासून अनेक उपाययोजना राबवल्या गेल्या, तसेच, सण उत्सवांत देखील सहभाग असतो. तसेच जिल्ह्यातील प्रभारी अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी यांना देखील वेळोवेळी नेहमीच मार्गदर्शन असतं, तसेच जिल्ह्यातील सर्वच पोलीसांच्या कामगिरीबद्दल देखील कौतुकाची थाप असते. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी कर्मचारी तसेच जिल्ह्याच्या सर्व सामान्य जनतेच्या अडचणी तसेच समस्या जाणणारा आणि जपणारा आयपीएस अधिकारी म्हणजेच समीर शेख साहेबांची ओळख आहे. साहेबांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यांचे औचित्य साधून विद्यमान एसपी साहेबांना संपूर्ण पोलीस प्रशासनांतून तसेच जिल्ह्याच्या अन्य प्रशासनांतून देखील शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. विद्यमान पोलीस अधीक्षकांनी देखील शुभेच्छांचा स्वीकार करीत सर्वांचेच मनापासून जाहीर आभार मानले.