विजय दिवस समितीच्यावतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन
राजेश भोसले / कराड प्रतिनिधी
७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कराड येथे विजय दिवस समितीच्यावतीने कराड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विजय दिवस समारोह समिती कराड, कराड नगरपरिषद कराड, पंचायत समिती कराड, तहसीलदार कार्यालय कराड व कराड शहर पोलीस स्टेशन, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने, भारताच्या शहीद जवानांच्या स्मरणार्थ उभारलेल्या विजय स्तंभावर, प्रमुख पाहुणे कराड एन सी सी बटालियनचे प्रमुख कर्नल जे पी सतिगिर यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून मानवंदना देण्यात आली. भारत माता की जय, जय जवान जय किसान या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
कर्नल सतिगिर यांनी शहीद जवानांना मानवंदना देऊन केलेल्या भाषणात म्हणाले, स्वातंत्र्य सेनानीनी अपार कष्टातून, प्रसंगी प्राणांचे बलिदान देऊन आपणास हे स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. त्याचे रक्षण आपले सैनिक प्रसंगी प्राणांचे बलिदान देऊन करीत आहेत, व करीत राहतील. आपण सर्वांनी "प्रथम आपला देश, नंतर देशबांधव, नंतर मी" या विचाराने प्रत्येकाने चालले पाहिजे, तरच गौरवशाली भारत निर्माण होईल. असे प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य गणपतराव कनसे यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी कर्नल झा, सुभेदार नानासाहेब, सुभेदार जयशिंग साळुंखे, सुभेदा भार्गव पाटील , विनायक पावसकर, सौरभ पाटील, वृक्षमित्र चंद्रकांत जाधव, विनायक विभुते, दिपक अरबुणे, सहसचिव विलासराव जाधव, प्रा. गणपतराव कनसे, प्रा. भगवानराव खोत, आॅनररी कॅप्टन बाबूराव कराळे, सतिश बेडके, मिनल ढापरे व त्यांचा सांस्कृतिक महिला ग्रुप, संतोष पवार, जयदीप अरबुणे, पत्रकार, पोलीस, एन सी सी चे विद्यार्थी व मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.