आनंदी तणावमुक्त जीवनासाठी चांगले शरीर व मन महत्व- डॉ.मनिषा भोजकर

आनंदी तणावमुक्त जीवनासाठी चांगले शरीर व मन महत्व- डॉ.मनिषा भोजकर

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : आपले शरीर चांगले असेल तर मन चांगले राहते आणि मन चांगले असेलतर जीवन तणावमुक्त होऊन आपण आनंदी जीवन जगू शकतो असे प्रतिपादन प्रसिद्ध आयुर्वेद कन्सल्टंट, कौन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट, व्याख्याती आणि लेखिका डॉ. मनिषा भोजकर यांनी ७१ व्‍या अखिल भारतीय सहकार सप्ताह अंतर्गत ‘आनंदी तणावमुक्त जीवन’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात केले.

          पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, आपल्या जगात जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या जीवनात अगणित ताण तणावांस प्रत्येकास सामोरे जावेच लागते. परंतु, त्याची तीव्रता कमी करून जीवन सुसह्य करण्यासाठी येणारे ताणतणाव जाणून घेऊन त्याला सामोरे गेल्यास तसेच योग्य व्यायाम, सात्विक आहार, शांत झोप, मनशांती, उत्तम सूर्यप्रकाश, संगीत, हसणे, निसर्गात वावरणे, समाज्यासाठी जगणे व आई-वडिलांचा चेहरा नेहमी आनंदी ठेवल्यास आपण सर्वजण आनंदमय तणावमुक्त जीवन जगू शकतो असे मार्गदर्शन केले व गोकुळने कोल्‍हापूर जिल्ह्यातील महिला दूध उत्पादकांना अर्थिक स्‍थैंर्य देण्याचे काम केले असून गोकुळचे कार्य व व्‍यवस्‍थापन बघून आपण भारावून गेलो असल्याचे मनोगत व्‍यक्‍त केले.

दरवर्षीप्रमाणे गोकुळ दूध संघा व जिल्हा सहकार बोर्ड यांच्यातर्फे गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयाच्‍या आवारात सहकार सप्‍ताह निमित्‍त व्याख्यान आयोजित करणेत आले होते. या कार्यक्रमाचे दिपप्रज्‍वलन डॉ. मनिषा भोजकर, गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व अधिकारी यांचे हस्‍ते करण्यात आले.

 या कार्यक्रमाचे स्‍वागत व प्रास्‍ताविक निता कामत यांनी केले व आभार मृण्मयी सातवेकर यांनी मानले तसेच सूत्रसंचालन डॉ.एम.पी.पाटील यांनी केले.

          याप्रसंगी संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, जिल्हा सहकार विकास अधिकारी बी.जी.साळोखे, तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्रा.एस.टी.जाधव, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.प्रकाश साळुंखे, संकलन व्‍यवस्‍थापक एस.व्‍ही.तुरंबेकर, दत्तात्रय वागरे, डॉ.प्रकाश दळवी, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, महिला नेतृत्‍व विकास अधिकारी निता कामत, संपदा थोरात तसेच संघाचे अधिकारी, कर्मचारी व महिला स्वयंसेविका उपस्थित होत्‍या.