एका आगळ्या-वेगळ्या कथानकासह एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
कोल्हापूर / प्रतिनिधी
आपण हवेत उडू शकतो असे जर कुणी म्हटले तर? आपला साहजिकच त्यावर विश्वास बसणार नाही किंवा मग आपण रॉकेटमधून उडण्याचा विचार करु. पण या कोणत्याही साधनाशिवाय आपण हवेत उडू शकतो असे कुणी म्हटलं तर? जसे हनुमानाने रामायणामध्ये सीतामाताच्या शोधासाठी हवेमध्ये उड्डाण घेतले होते. खरचं असे काही घडले तर नेमके काय होईल तेच दाखवण्यासाठी एका आगळ्या-वेगळ्या कथानकासह एक नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय. गेला उडत! एका मध्यमवर्गीय व्यक्तीभोवती हे कथानक गुंफलेलं आहे.
गरीबीचे चटके, कुटुंबातल्या जबाबदाऱ्या, आपल्याच कुटुंबियांच्या वाढत्या मागण्या या सगळ्यांना पूर्ण करण्यासाठी सातत्याने येणारे अपयश यामुळे चित्रपटातल्या मुख्य पात्राचे आयुष्य ग्रस्त असते. पण त्याची श्री हनुमानावर प्रचंड श्रद्धा असते. आधी त्याच्यावर साहजिकच विश्वास ठेवायला लागतात खरे. पण त्याला उडताना मात्र, कुणीच पाहिलेले नाही. शेवटी एकतर आम्हाला हवेत उडून दाखव, नाहीतर परिणामांना तयार रहा असा इशाराच जेव्हा त्याला आसपासची मंडळी देतात, तेव्हा मात्र कसोटीचा क्षण उभा ठाकतो. या प्रशनाचं उत्तर तो कसं शोधतो ? तो खरंच उडू शकतो का? हे पाहण्यासाठी २५ ऑगस्ट रोजी आपल्याला नजीकचे चित्रपटगृह गाठावंच लागेल.
मिना शमीम फिल्मस् प्रस्तुत 'गेला उडत' या चित्रपटाची निर्मिती मुन्नावर शमीम भगत यांनी केली आहे. चित्रपटाची कथा-पटकथेसह दिग्दर्शनही मुन्नावर शमीर भगत यांचच आहे. रफिक शेख यांनी संगीत दिलं असून पार्श्वगायन सलील अमृते यांचं आहे. मकरंद पाध्ये, ज्योत्स्ना राजे गायकवाड, प्रसाद माळी, शालवी शाह, किसन खंदारे यांच्या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. 6 एन की चांगले
अंधश्रध्दा बऱ्याचदा नुकसान करणाऱ्या जरी असल्या, तरी अनेकदा त्यामुळे काही आयुष्यं पूर्णपणे बदलून जातात. अशाच एका बदललेल्या आयुष्याची कथा 'गेला उडत' चित्रपट आपल्यासमोर उभी करणार आहे.