चंदगड पोलीस हेड कॉन्स्टेबल लाच लुचपतच्या जाळ्यात..केली "इतक्या" रुपयांची मागणी..!
कोल्हापूर (प्रतिनिधी ) : गुन्हयामध्ये अटक करायची नसेल तर पाच हजार रुपये द्या अशी मागणी करत साडेचार हजार रुपयेची लाच स्वीकारणाऱ्या चंदगड पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल राजीव शामराव जाधव (गडहिंग्लज) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.
आज (शुक्रवारी) दुपारी ही कारवाई झाली. या संदर्भातील अधिक माहिती अशी, यातील तक्रारदाराच्या विरोधात चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजीव जाधव करत होते. जाधव यांनी तक्रारदाराला नोटीस दिली. तसेच या गुन्ह्यांमध्ये अटक करायची नसेल तसेच वाढीव कलम न लावता तपासात मदत करण्यासाठी 5 हजार रुपये लाचेची मागणी केली.
यासंबंधी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाच लचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला आणि कारवाई केली. दरम्यान काही दिवसापूर्वी चंदगड तालुक्यात लााचखोरी प्रकरणी कारवाई झाली आहे. पाणीपुरवठा विभागाच्या महिला उपअभियंत्यावर लाच स्वीकारताना कारवाई झाली होती. त्या वेळी चंदगड तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली होती.