माळशेज घाटात दरड कोसळल्याने कल्याण-नगर मार्गावरील वाहतूक ठप्प

माळशेज घाटात दरड कोसळल्याने कल्याण-नगर मार्गावरील वाहतूक ठप्प
माळशेज घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प

माझा महाराष्ट्र \ प्रतिनिधी :


गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे माळशेज घाटात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नगर-कल्याण महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाट रस्त्यावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. माळशेज घाट पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना रोखण्यासाठी याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये कुणालाही इजा झालेली नाही. परंतु महामार्गाचा काहीसा भाग खचला आहे. माहिती मिळताच बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने दरडी हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.