बिर्ला शक्तीच्या केसोराम सुपरप्लास्ट सिमेंटचे इचलकरंजीत लोकार्पण

बिर्ला शक्तीच्या  केसोराम सुपरप्लास्ट सिमेंटचे इचलकरंजीत लोकार्पण
बिर्ला शक्तीच्या केसोराम सुपरप्लास्ट सिमेंटचे इचलकरंजीत लोकार्पण

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी


बिर्ला शक्ती सिमेंटच्या नवीन केसोराम सुपरप्लास्ट या सिमेंटचा लोकार्पण सोहळा इचलकरंजी येथे पार पडला. कंपनीच्यावतीने आयोजित या मेळाव्यात बिर्ला शक्ती कंपनीचे व्होल टाइम डायरेक्टर आणि ग्रुप सीईओ पी. राधाकृष्णन, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अभय दधीच, नॅशनल सेल्स हेड मुद्दसर शेख हे उपस्थित होते.

बिर्ला शक्ती सिमेंटने केसोराम सुपरप्लास्ट हे नवीन सिमेंट बाजारपेठेत आणले आहे. गिलावा, फरशी फिटिंग, कोबा व बांधकामसाठी अत्यंत गुणवत्तापूर्ण असे हे विशेष उत्पादन आहे. त्याची सुरुवात महाराष्ट्रात कंपनीने इचलकरंजीतून केली आहे. इचलकरंजी येथील महेश क्लब या ठिकाणी हा मेळावा पार पडला.

स्वागत आणि प्रास्ताविकात बिर्ला शक्तीचे सेल्स प्रमोटर नितीन धूत यांनी कंपनीच्या या नवीन उत्पादनाचे इचलकरंजीत जास्तीत जास्त विक्री करू अशी ग्वाही दिली. व्होल टाइम डायरेक्टर व ग्रुप सीईओ पी. राधाकृष्णन यांनी बांधकाम क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सिमेंटची मागणी लक्षात घेऊन केसोराम सुपरप्लास्ट सिमेंट आणले आहे. हे सिमेंट बांधकाम क्षेत्रात नक्कीच वरदान ठरेल अशी आशा आहे. कोणत्याही उत्पादनासाठी कोल्हापूरची भूमी ही अत्यंत यशस्वी ठरते. त्यामुळे या ठिकाणाहून महाराष्ट्रभर सुरू होणारे वितरण नक्कीच विक्रीमध्ये घोडदौड करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अभय दधीच यांनी हे उत्पादन बाजारात सर्व गुणवत्तापूर्ण चाचण्या करून आणले आहे. त्यामुळे या नावीन्यपूर्ण उत्पादनाला आपण प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले. टेक्निकल हेड राजपाल सिंग यांनी केसोराम प्लास्टर सिमेंटचे टेक्निकल माहिती दिली. नॅशनल सेल्स हेड मुद्दसर शेख यांनी यापूर्वी प्रत्येक उत्पादनास कोल्हापूर शाखेने दिलेल्या प्रतिसादाचे कौतुक करून असाच प्रतिसाद या नव्या उत्पादनाला ही नक्कीच देतील असे सांगितले. 

यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विविध प्रतिनिधीशी हितगुज केले. यावेळी देशातील टॉप टेन आर्किटेक्टमध्ये आर्किटेक्ट  मंहतेश कोकळकी यांचा गौरव झाल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. निषाद जोशी यांनी आभार मानले.


या कार्यक्रमास बिल्डर्स असोसिएशन इचलकरंजीचे उपाध्यक्ष फैय्याज गैबान, इंजिनीअर असोसिएशनचे अध्यक्ष विवेक सावंत, क्रेडाईचे माजी अध्यक्ष सय्यद गफारी, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे बळिराम घायतीडक, बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष  मुसा खलिफा, रेडी मिक्स काँक्रिटचे तानाजी हराळे, डॉ. किरण पवार, रमेश मर्दा, कंपनीचे साऊथ महाराष्ट्र रिजनल हेड निशाद जोशी, टेक्निकल हेड राजपाल सिंग, कोल्हापूर, सांगली ब्रांच मॅनेजर जयवंत लोखंडे, सांगली ब्रांच इन्चार्ज शादाब शिलेदार, मार्केटिंग ऑफिसर दीपक सावंत त्याचबरोबर इचलकरंजी परिसरातील ४०० हून अधिक इंजिनियर, आर्किटेक्ट, बिल्डर्स, रिटेलर कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.