HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये शिवजयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये शिवजयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये शिवजयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन 

दिनेश पवार : दौंड प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नाचून साजरी करण्याऐवजी वाचून साजरी करा. जन्माने मध्ययुगीन पण जगण्याने आधुनिक असणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. आजच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणावेत असे विचार नारायणगाव येथील इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. लहू गायकवाड यांनी व्यक्त केले.  ते शिवजयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून एस. एम. जोशी कॉलेजमध्ये बोलत होते.  महाविद्यालयातील इतिहास विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड म्हणाले की, छत्रपती शिवराय हे रयतेचे राजे होते. त्यांच्याकडे दूरदृष्टी असल्यामुळेच त्यांनी जलदुर्ग उभे केले.  गनिमी काव्याने रयतेचे राज्य उभे केले. असे मत प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड म्हणाले. शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी गड-किल्ल्यांचे प्रदर्शन आयोजित केले होते. त्याचे संयोजन प्रा.डी. डी. गायकवाड व इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.  गजानन घोडके यांनी तर सूत्रसंचालन प्रा.प्रांजली शहाणे व डॉ.नम्रता कदम यांनी केले. कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.शिल्पा शितोळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी  उपप्राचार्य प्रा.संजय जडे, आय.क्यू.ए.सी.चे समन्वयक डॉ.किशोर काकडे, उपप्राचार्य प्रा.संजय जगताप, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व बहुसंख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.