उन्हाळी सुट्टीसाठी एस टी महामंडळाकडून ज्यादा बसेस नियोजन

उन्हाळी सुट्टीसाठी  एस टी महामंडळाकडून ज्यादा बसेस नियोजन

उन्हाळी सुट्टीकरीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस सज्ज झाल्या आहे याबाबत माहिती देत १० एप्रिल ते १५ जून हा उन्हाळी हंगामातील गर्दीचा हंगाम असल्याने या महिन्यात राज्य परिवहन महामंडळामार्फत प्रवाशांच्या सोयीसाठी दरवर्षी जादा वाहतूक करण्यात येते. उन्हाळी हंगामामुळे लहान, मोठे, तरुणवर्ग, महिला वर्ग पर्यटन आणि भटकंतीसाठी बाहेर पडत असतात. त्यामुळे प्रवाशांची गरज ओळखून राज्य परिवहन महामंडळ कोल्हापूर विभागामार्फत मुंबई, बोरीवली, पुणे, ठाणे, रायगड, बीड, परभणी, शिर्डी, लातूर, छत्रपती सोलापूर, संभाजीनगर, पंढरपूर, अक्कलकोट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण मार्गावर जादा बसेसचे नियोजन केले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ऑनलाईन आरक्षणासाठी बसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

एप्रिल, मे आणि जूनमध्ये विवाह मुहूर्त असल्याने राज्य परिवहन कोल्हापूर विभागामार्फत लग्न कार्यासाठी विशेष बस सेवेअंतर्गत आणि ग्रुप बुकिंगवर बस सेवा देण्यात येणार आहेत. त्यामुळे आवश्यक बसेस बुकिंग करून ठेवाव्यात, जेणेकरून ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल. तरी, प्रवाशांनी राज्य परिवहन वाहतुकीचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा,असे आवाहन कोल्हापूर विभागातर्फे करण्यात आलंय.