विजापूर रोड येथील राष्ट्रीय महामार्ग रोडवर गतिरोधक बसवावे - अनिल धायगोडे

विजापूर रोड येथील राष्ट्रीय महामार्ग रोडवर गतिरोधक बसवावे - अनिल धायगोडे

विजापूर रोड येथील राष्ट्रीय महामार्ग रोडवर गतिरोधक बसवावे - अनिल धायगोडे  

सोलापूर प्रतिनिधी 

सोलापूर - विजापूर येथील राष्ट्रीय महामार्गवरील नडगेरी पेट्रोल पंपासमोर मुख्य रोड वर गतिरोधक करण्याची गरज आहे,  येथील महाराणा प्रताप नगर, नम्रता हौसिंग सोसायटी, जयकुमार नगर, नूतन मराठी शाळा, बिलाल नगर येथील रहिवास्यांना शहरात येताना व शहरातून घरी जाताना मुख्य रस्त्यावर प्रवेश करताना प्रचंड मानसिक त्रास होत आहे. प्रवासाना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. नडगेरी पेट्रोल पंपासमोर गतिरोधक केल्यास वाहनांचा वेग कमी होऊन प्रवास सुखकर होईल. गेल्या काही दिवसात त्याच ठिकाणी किरकोळ अपघात झालेले आहेत. भविष्यात मोठा अनर्थ होऊ नये त्याच बरोबर विजापूर नाका, ITI, अशोक नगर आदी ठिकाणी तातडीने गतिरोधक करण्यात यावे व लोकांचा प्रवास सुखकर करावा अशी मागणी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापूर यांच्याकडे मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन यांच्या कडून करण्यात आले.