ओम मार्शल आर्ट अँड सोशल सर्विस असोसिएशनच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय कराटे स्पर्धेत निवड
ओम मार्शल आर्ट अँड सोशल सर्विस असोसिएशनच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय कराटे स्पर्धेत निवड
सदाशिव रणदिवे / पुणे जिल्हा प्रतिनिधी
ओम मार्शल आर्ट अँड सोशल सर्विस असोसिएशनच्या खेळाडूंची राष्ट्रीय कराटे स्पर्धेत निवड झाली आहे.
ओम मार्शल आर्ट अँड सोशल सर्विस असोसिएशन दौंड खेळाडूंची बारामतीतील जिल्हा क्रीडा संकुलन पुणे, बारामती घेण्यात आलेल्या दिनांक ९ व १० सप्टेंबर २०२३ रोजी राज्यस्तरीय अजिंक्य स्तर कराटे स्पर्धा २०२३-२४ आयोजित महाराष्ट्र कराटे असोसिएशन (मान्यताप्राप्त महाराष्ट्र ओलंपिक असोसिएशन) या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेकरिता राज्यातील २९ जिल्ह्यातून १४७० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत ओम मार्शल आर्ट असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी चमकदारी कामगिरी केली सदर स्पर्धेमध्ये पायल वांबिरे (प्रथम क्रमांक) व आरुषी मुंडे (तृतीय क्रमांक) यांनी यश मिळवले यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे मार्गदर्शक श्री मंगेश चव्हाण प्रशिक्षक नितीन चव्हाण, सनी वाल्मिकी, गौरव गवळी यांचे मार्गदर्शन लाभले सदर विद्यार्थ्यांना पुढील होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये निवड झाल्याबद्दल संदीप शेलार (चिप रेल्वे तिकीट इन्स्पेक्टर दौंड आणि नॅशनल रेल्वे मजदूर युनियन सेक्रेटरी दौंड) हनुमंत वाघ (दौंड रेल्वे तिकीट इन्स्पेक्टर) दौंड योगा अँड स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्षा श्रीमती वर्षा चव्हाण तसेच ओम मार्शल आर्टचे संस्थापक महेश चव्हाण आणि उपाध्यक्ष सुधाकर यरोळ यांनी पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या.