हॉटेल साईसागर गार्डन अधिकृत थांबा रद्द करून देखिल एस टी महामंडळाच्या बसेस थांबवून प्रवाशांच्या जिवीताशी खेळ
पुणे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव रणदिवे
कुरकुंभ - दिनांक 01.07.2022 ते 30.06.2025 या कालावधीसाठी रा.प. महामंडळाच्या परिपत्रकीय सुचना तसेच अटी व शर्तीच्या आधीन राहून हॉटेल थांब्यास मंजुरी देण्यात आलेली होती. तथापि हॉटेल साईसागर गार्डन या ठिकाणी अधिकृत हॉटेल थांबा मंजुर केल्यानंतर हॉटेलवर थांबविण्यात येणा-या रा.प. बसेसमधील प्रवाशांनी आपल्या हॉटेलमध्ये मिळणा-या खाद्यपदार्थांबाबत, स्वच्छतागृहाबाबत तसेच हॉटेलमधील कर्मचारी यांचे गैरवर्तणूकीवाचत विविध स्थरावर तसेच लोकप्रतिनिधी, वर्तमानपत्राच्या माध्यमातून गंभीर स्वरुपाच्या तक्रारी केल्यामूळे रा.प. पुणे विभागाकडून हॉटेलची अनेकवेळा तपासणी करण्यात आली तपासणी करीत असताना रा.प. महामंडळाचे नाथजल बाटलीबंद पाणी विक्री करण्याचे सुचना देऊनही यामध्ये सुधारणा होत नसल्याचे दिसून आल्यामुळे एस टी महामंडळाने दिनांक 03.10.2022 नुसार रु. 3000/- इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आलेली होती. तसेच त्यानंतर दिनांक 18.01.2023 नुसार हाॅटेलमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा दिसुन न आल्यामुळे पुनश्चः रु. 3000/- इतक्या रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आलेली होती.
दिनांक 02.12.2023 रोजी मा. अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी हॉटेल साईसागर गार्डन येथील तपासणी करून तपासणीमध्ये आढळलेल्या स्वच्छतेच्या दर्जाबाबत, अन्नपदार्थांचा साठा व तयार करण्याच्या जागेतील भिंतीचे प्लास्टर रंग नसलेबाबत असे अहवालातील अ.क्र. 1 ते 23 मध्ये नमुद बाबींची तपासणी करुन यामध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती आढळल्याने हॉटेल साईसागर गार्डनची अन्न व औषध प्रशासनाने दिलेला अन सुरक्षा मानदे अधिनियम 2006 नुसार दिलेला परवाना 4 दिवसासाठी निलंबित केलेला आहे. त्यामुळे रा. प. प्रवाशांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दिलेला अधिकृत हॉटेल थांबा दिनांक 28.12.2023 रोजी पासून तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात आला असूनदेखिल आणखी बसेस थांबत आहेत. त्या हाॅटेल वरील स्वच्छता नसल्यामुळे परवाना रद्द केला असला तरीही आणखी बसेस थांबवून प्रवाशांच्या जिवीताशी का खेळले जाते असा प्रश्न उपस्थित होत आहे.