राधानगरी धरणाचा ६ नंबरचा स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला
कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरण क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरुच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 17 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत. तसेच राधानगरी धरणाचा सहा क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा आज पुन्हा उघडला आहे. त्यामुळे धरणातून 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील खालील बंधारे पाण्याखाली :
नदी | बंधारे |
पंचगंगा नदी | शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि शिरोळ |
भोगावती नदी | तारळे, हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे |
वारणा नदी | चिंचोली आणि तांदूळवाडी |
दुधगंगा नदी | दत्तवाड |
कासारी नदी | यवलूज आणि ठाणे आळवे |