संग्राम खराडे यांच्याकडून ‘सारथी’च्या विविध योजनांचा प्रसार

‘सारथी’च्या विविध योजनांचा प्रसार

संग्राम खराडे यांच्याकडून ‘सारथी’च्या विविध योजनांचा प्रसार
‘सारथी’च्या विविध योजनांचा प्रसार

सुभाष भोसले / प्रतिनिधी 

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे या संस्थेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली येणाऱ्या विविध योजनांची माहिती घेऊन शिंदेवाडी येथील संग्राम भरत खराडे यांनी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र दिनानिमित्त कागल तालुक्यातील शिंदेवाडी येथे जनजागृती करण्याचे काम केले होते. 

यावेळी शिंदेवाडी गावच्या सरपंच रेखा रमेश माळी, ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ ऍड- जीवनराव पुंडलिक शिंदे,  ग्रामसेवक -विजय पाटील, अरविंद ईश्वरा शिंदे सेवानिवृत्त मुख्याध्यापक, ग्रामस्थ नामदेव सखाराम शिंदे, रवींद्र जयसिंग शिंदे , सुनील बाळू शेलार इत्यादी मान्यवर पालक विद्यार्थी महिला उपस्थित होते. 

संग्राम भरत खराडे यांनी सारथी संस्थेची स्थापना त्यांची मुख्य कार्यालय विभागीय कार्यालय व त्या माध्यमातून मराठा, कुणबी मराठा यांच्यासाठी काम करत असून तसेच यूपीएससी, एमपीएससी, परदेशी भाषा, सेट नेट, M.phil, ph.D, छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी कौशल्य विकास कार्यक्रम इंडो जर्मन टूल रूम राजमाता जिजाऊ सार्थक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येणारे योजना डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना यावर नमूद केलेल्या घटकांसाठी राबविण्यात येत असून भविष्यकालीन योजनांचा आराखडा याबाबत वाचन करत असताना सविस्तर मार्गदर्शन केले. 

यावेळी शिंदेवाडी गावच्या सरपंच रेखा रमेश माळी उपस्थित होत्या. ग्रामसेवक विजय पाटील यांनी सारथीच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तरपणे माहिती पालक, विद्यार्थी आणि उपस्थित ग्रामस्थांना दिली. त्यामुळे अनेकांना यातून पुढील दिशा मिळणार आहे असे सांगत त्यांनी आभार मानले.