श्री नृसिंह चषक क्रिकेट स्पर्धेत देशमाने वॉरियर संघ विजयी..

श्री नृसिंह चषक क्रिकेट स्पर्धेत देशमाने वॉरियर संघ विजयी..

श्री नृसिंह चषक क्रिकेट स्पर्धेत देशमाने वॉरियर संघ विजयी..

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथे श्री नृसिंह तरुण मंडळांने आयोजित केलेल्या द्वितीय पर्व मध्ये, श्रीराम सांस्कृतिक मंगल कार्यालय संघ विरुद्ध देशमाने वॉरियर्स संघ हा अंतिम सामना, देशमाने वॉरियर्स या संघाने जिंकला. या स्पर्धेचे आयोजन मलकापूर हायस्कूलच्या क्रीडांगणावर केले होते. ही स्पर्धा सायंकाळी 6 नंतर सुरू होत असून, यामध्ये 7 संघ सहभागी झाले होते. श्रीराम संघाने पाच षटकात 41 धाव संख्या प्राप्त केली, यावेळी मिहीर कोठावळे व अश्विन पवार यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. देशमाने वॉरियर संघाकडून अखिलेश पवार व आकाश देशमाने यांनी सुरुवातीपासूनच फटकेबाजी करत एकही विकेट न गमावता संघाला विजय प्राप्त करून दिला.
प्रथम क्रमांक- देशमाने वॉरियर्स, द्वितीय क्रमांक- जय श्रीराम सांस्कृतिक मंगल कार्यालय संघ, तृतीय क्रमांक - एस. पी. बॉईज

मॅन ऑफ द टूर्नामेंट- संकेत पवार, उत्कृष्ट गोलंदाज- शुभम माने, उत्कृष्ट फलंदाज -अश्विन पवार, मॅन ऑफ द मॅच -आकाश देशमाने तसेच पंच म्हणून निलेश कडवेकर, प्रशांत चोरगे, ओंकार वारंगे, उत्कर्ष कोठावळे यांनी काम पाहिले.