संभाजीनगरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा
कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे आणि शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्यात जोरदार राडा झाला.
छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी विरोधी पक्षातील आमदारांना निधी देण्यात येत नसल्याचा आरोप केला. त्यानंतर पणन मंत्री अब्दुल सत्तार आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री तथा रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी अंबादास दानवे यांचा एकेरी उल्लेख केला. यामुळं तिघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. यानंतर भर सभेमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. याप्रकरणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.